
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अध्यक्ष निलेशजी सांबरे यांचे गुहागर नगरीत जंगी स्वागत
आबलोली :जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अध्यक्ष निलेशजी सांबरे यांचे गुहागर नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी जंगी स्वागत केले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी विभाग या संस्थेच्या वतीने गुहागर येथे मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय गुहागर येथे भव्य उदघाटन सोहळा व करिअर मार्गदर्शन मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेशजी सांबरे यांचे गुहागर नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी जंगी स्वागत केले यावेळी त्यांचे सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी संतोष जोशी, श्री. मांडवकर, शासकीय ठेकेदार सिद्धेश आरेकर, सुरज चव्हाण आदी. उपस्थित होते