
कोकण रेल्वेने सिंधुदुर्गला सापत्न वागणूक देऊ नये, कोकण रेल्वे संघर्ष समिती.
सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर अनेक समस्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुविधा देताना सापत्नभावाची वागणूक देवू नये, गोवा रत्नागिरीप्रमाणे येथेही सुविधा निर्माण करा, गणेशोत्सवापूर्वी सर्व स्थानकांची स्वच्छता आणि पाणी सुविधा सुरू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कोकण रेल्वेच्या अधिकार्यांना दिल्या.
कोकण रेल्वे संघर्ष व समन्वय समितीने आपल्या विविध मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संघटनेचे पदाधिकारी व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित बठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.www.konkantoday.com