कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्यातून जाणाऱ्यांसाठी पुणे रेल्वे विभागाकडून १२ विशेष रेल्वे सोडण्यात येणार


कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्यातून जाणाऱ्यांसाठी पुणे रेल्वे विभागाकडून १२ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सुरू झाले आहे. कोकणात गणोशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्यासाठी कोकणवासी आपली गावी जातात. पुण्यात नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने कोकणातील अनेक नागरिक राहतात. त्यामुळे रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे ते रत्नागिरी साप्ताहिक विशेष
पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक ०१४४७ शनिवारी २३, ३० ऑगस्ट व सहा सप्टेंबर रोजी पुण्यातून रात्री १२ वाजून २५ वाजता सुटेल. ती रत्नागिरी येथे सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४८८ साप्ताहिक विशेष रेल्वे शनिवार २३, ३० ऑगस्ट आणि सहा सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे पहाटे पाच वाजता पोहोचेल.

पुणे-रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४४५ मंगळवार २६ ऑगस्ट आणि दोन व नऊ सप्टेंबर रोजी पुण्यातून रात्री १२ वाजून २५ वाजता सुटेल. ती रत्नागिरी येथे सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४६ मंगळवार २६ ऑगस्ट आणि दोन व नऊ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे पहाटे पाच वाजता पोहोचेल.

या दोन्ही गाड्यांना चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button