
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, दापोली शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव
रत्नागिरी, चिपळूण, दापोली शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून तयार आराखड्यावर येणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रत्नागिरी नगर पालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव २०१५ मध्येच शासनाकडे पाठवण्यात आलेला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिलेली आहे. पुढील वीस वर्षाचा विचार या हद्दवाढीमध्ये करण्यात आलेला असून त्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले.शहर हद्दवाढीच्या दृष्टीने लवकरच हालचाली सुरु होणार आहेत.
रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीमध्ये १५ ग्रामपंचायती प्रस्तावित आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिरगाव, मिरजोळे, कुवारबाव, नाचणे, पोमेंडी, खेडशी या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. चिपळूण व दापोलीमध्येही आजुबाजूची गावे घेऊन हद्दवाढ करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com