
श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन.
रत्नागिरी : येथील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने शहरातील श्री राधाकृष्ण मंदिर, राधाकृष्ण नाका २ व ३ ऑगस्ट या कालावधीत श्री राधाकृष्ण चषक या नावाने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा १ पुरुष एकेरी, २ पुरुष दुहेरी, ३ महिला एकेरी, ४ कुमार गट, ५ कुमारी गट ६ किशोर गट व ७ किशोरी गट अशा सात गटात खेळवली जाणार आहे. या वर्षातील ही तिसरी स्पर्धा आहे.
जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही त्या खेळाडूंनी २०२५-२६ या वर्षाची रजिस्टेशन फी ५० रुपये जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये व लहान गटासाठी १०० रुपये याप्रमाणे असेल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. ही स्पर्धेत सामना खेळण्यासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. मागावून कोणतीही तक्रार एकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी.
तालुका प्रतिनिधी असे :
गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०),
रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३),
देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८),
मोहन हजारे (९४२२०५३९४३),
चिपळूण – प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५),
संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५),
लांजा – मनोज जाधव (७६२०११६७३६),
खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६),
दापोली – माधव शेट्ये (९२०९७०९७९२)
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून विनय गांगण व सागर कुलकर्णी यांची व स्पर्धा प्रमुख म्हणून सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू, सचिव मकरंद खातू, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, खजिनदार नितीन लिमये, सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.