
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील उतारावर गुरुवारी डंपर खड्ड्यात पडून अपघात
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील उतारावर गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डंपर खड्ड्यात पडून अपघात झाला. या दुर्घटनेत डंपर चालक किरकोळ जखमी झाला आहे.पालीहून रत्नागिरीकडे जात असलेला डंपर हातखंबा दर्ग्याजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे डंपर विरुद्ध दिशेला जाऊन उजव्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाला. अपघातात चालक थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.