
माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या पुढाकाराने गणेश चतुर्थीसाठी कोकणात धावणार अधिक विशेष रेल्वेगाड्या,वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबतही सकारात्मक हालचाल.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या वर्षी गणेशोत्सवासाठी गतवर्षीपेक्षा अधिक विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. याबाबत त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेऊन संबंधित मागण्या मांडल्या होत्या, ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.खा. राणे यांनी गणेशोत्सवाचा कोकणवासीयांसाठी असलेला सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व अधोरेखित करत, मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी प्रवास सुलभ व्हावा यासाठी रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. यासोबतच, विशेष गाड्यांची लवकर घोषणा व आरक्षण सुरू करण्याचे, तसेच स्लीपर व जनरल डब्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याचेही आवाहन त्यांनी केले.महत्त्वाच्या मागण्या व निर्णय:मुंबई, पुणे आदी शहरांना कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या वाढविणे.गाड्यांचे वेळापत्रक वेळेवर जाहीर करणे व आरक्षणाची प्रक्रिया लवकर सुरू करणे.स्लीपर व जनरल डब्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याचा विचार.गाड्यांचे काही मार्ग विस्तारून कोकणातील अधिक ठिकाणांना कव्हर करणे.संगमेश्वर रोड स्टेशनवरील थांब्याची मागणीही मान्यखा. राणे यांनी संगमेश्वर रोड स्टेशनवर 19577/19578 जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस व 20910/20909 पोरबंदर-तिरुवनंतपुरम एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्याची मागणीही पत्राद्वारे केली होती. त्यास कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने १० जुलै २०२५ रोजी उत्तर देत सांगितले की, या गाड्यांचा थांबा येथे कार्यान्वित करणे शक्य आहे. सध्या येथे १२ गाड्या थांबतात आणि तिकिट विक्री तसेच उत्पन्न समाधानकारक असल्याने हा थांबा व्यावसायिकदृष्ट्याही व्यवहार्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.लाखो भाविकांना दिलासाया निर्णयामुळे कोकणात आपल्या गावी गणपती साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवास अधिक सुकर, सुलभ आणि नियोजनबद्ध होणार असून, गणेशोत्सव अधिक आनंदात साजरा करण्यासाठी रेल्वेसेवेचा हा निर्णय मोलाचा ठरणार आहे.वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबतही सकारात्मक हालचालबैठकीदरम्यान वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकर प्रस्तावित करण्याचे आदेशही रेल्वेमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती खा. राणे यांनी दिली.