जयगड येथील समुद्रात एमव्ही गोल्डन फॉर्चुन या जहाजावर सर्वेअर म्हणून काम करत असताना प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

जहाजावर सर्वेअर म्हणून काम करत असताना प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार 21 जुलै रोजी रात्री 9.30 वा.सुमारास जयगड येथील उर्जा रुग्णालयात घडली असून याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.श्रीमंता शरणप्पा हरीजन (41, रा.वास्को द गामा साउथ गोवा) असे मृत्यू झालेल्या सर्वेअरचे नाव आहे. तो जयगड येथील समुद्रात एमव्ही गोल्डन फॉर्चुन या जहाजावर असताना खबर देणार राजेश जयस्वाल यांना त्या जहाजावरील इतर कर्मचार्‍यांनी व्हीएचएफव्दारे कॉल करुन श्रीमंता हरीजन हा केबीनमध्ये पडलेला असून त्याच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे कळवले. त्यानुसार, राजेश जयस्वाल यांनी ओएचसी पोर्ट येथून त्या जहाजावर वैद्यकिय मदत पाठवली होती. वैद्यकिय अधिकार्‍यांनी श्रीमंताला तपासले असता त्याचे पल्स चालू नसल्याने त्याला जयगड येथील उर्जा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी श्रीमंताला तपासून मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button