
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ‘मृदा विश्लेषण प्रमाणपत्र कोर्स’ संपन्न.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये, रसायनशास्त्र विभागाकडून पी. एम. उषा योजनेअंतर्गत तृतीय वर्ष विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी मृदा विश्लेषणाच्या सर्टिफिकेट कोर्सचे (सॉईल ऍनालिसिस सर्टिफिकेट कोर्स) आयोजन करण्यात आले होते. दि. १२ जुलै ते १६ जुलै २०२५ अशा पाच दिवसांच्या कोर्स मध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रात्यक्षिकांसह मुलांना मृदा परीक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना श्री. चेतन प्रभू, संचालक स्वामी लॅब सोल्युशन्स, कणकवली, डॉ. मिलिंद गोरे, माजी रसायनशास्त्र विभाग प्रमुख, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, डॉ. विजय गुरव, सहाय्यक प्राध्यापक, दापोली अर्बन बँक सीनियर कॉलेज, डॉ. किरण मालशे, प्रभारी संचालक, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटे, रत्नागिरी, श्री. खरात, उपकृषी अधिकारी, जिल्हा मृदा चाचणी प्रयोगशाळा, पोमेंडी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या कोर्समध्ये मातीचे नमुने कसे तयार करावे तसेच मातीविषयी इतर आवश्यक घटकांबाबत प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
सदर कोर्सच्या उद्घाटनसमयी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञानशाखा उपप्राचार्य, रसायनशास्त्र विभागप्रमुख तसेच पी. एम. उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या. कोर्सच्या समारोप प्रसंगीमार्गदर्शनकरतानामहाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई यांनी भूगोल विषय आणि मृदा परीक्षण यांचा सहसंबंध विद्यार्थ्यांनाउलगडून दाखविला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पाच दिवसीय सर्टिफिकेट कोर्स यशस्वीपणे संपन्न झाला. रसायनशास्त्र विभागातील प्रा. प्रतीक्षा बारस्कर, प्रा. शिरीन लिमये यांनी सदरकोर्सचे नियोजन केले. समारोप समारंभ प्रसंगी सहभागीविद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. साक्षी चाळके यांनी केले.