
रत्नागिरी शहरात शिवसेनेकडून सक्तीने दुकाने बंद करण्याचा प्रकार, व्यापाऱ्यांच्या नाराजी
आज शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे त्याला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे रत्नागिरी शहरात आज सकाळी उघडण्यात आलेलीकाही दुकाने शिवसैनिकांनी सक्तीने बंद करण्यात आल्याचे प्रकार घडला आहे यामुळे व्यापाऱ्यांची नाराजी उमटली आहे आधीच कोरोनामुळे अडचणीत आलेले व्यापारी आता कुठे थोडेफार सावरत असतानाच बंदच्या नावाखाली सक्ती करणे म्हणजे अन्यायकारक असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे वास्तविक आज बंदच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवणे आवश्यक होते रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघटनेनेही बंदला कोणत्याही पाठिंबा देणारे पत्रक काढलेले नाही असे असताना शिवसैनिकांकडून सक्तीने दुकाने बंद करण्यात येत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
www.konkantoday.com