
उद्योजक गौरांगआगाशे यांनी दिले जी एम शेट्ये हायस्कूल बसणी हायस्कूलला दोन कम्प्युटर भेट.
उद्योजक गौरांगआगाशे यांनी दिले बसणी हायस्कूलला दोन कम्प्युटर भेट दिले असून याबाबतची पार्श्वभूमी सांगताना सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत म्हणाले कीगुरूपौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी प्रमुख व्यक्ती ज्यांच्या हस्ते हे सत्कार झाले तो आमचा गावचा सुपुत्र श्री गौरांग आगाशे याने साईमंदिरात कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना त्याच्या संबंधित कंपनीने पाच काॅम्प्युटर दिले होते ते सर्व काॅम्पुटर माझ्या मागणीप्रमाणे साईमंदिराला जाहीर केले होते पण मी गौरांगला विनंती केली आमच्या मंदिराच्या उपक्रमासाठी तीन काॅम्प्यूटर ठेवून उरलेले दोन बसणी येथील हायस्कूलला देवूया आणि गौरांगनेही लगेचच मान्यता दिली काका तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे आणि आज जी एम शेट्ये हायस्कूल बसणी या शाळेचे अध्यक्ष अॅड अविनाश ( भाऊ ) शेट्ये म्हणजे माझा जिवलग काॅलेज मित्र आणि दुसरा आमचा मित्र शाळेचा पदाधिकारी असलेला आमचा बापू गवाणकर यांच्या कानावर ही बाब घातली आणि बसणी शाळेच्या सभागृहात एक छोटेखानी कार्यक्रमात गौरांग आगाशे याच्या शुभहस्ते हे दोन काॅम्प्यूटर शाळेला दिले गौरांग आगाशे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना शाळेला ज्यावेळी जी काही मदत लागेल ती मी नक्की करेन या काॅम्प्युटरचा देखभाल देखील मी करणार आहे असे आश्वासीत केले. मित्रांनो परवा माझ्या नाचणे गावातील शाळेत वह्या वाटप केल्या त्यावेळी मी आमच्या शाळेत मुलांची संख्या पाहिली आणि आवाक झालो सर्व पालक आता शहरातील शाळेत मुलांना घालतात त्यामुळे गावातील शाळा ओस पडायला लागल्या आहेत आज बसणीतील या हायस्कूलला भेट दिल्यावर कळले या परिसरातील सर्व मुले रत्नागिरी शहरातील शाळेत घालतात त्यामुळे आज ज्यांची परिस्थिती नाही तीच मुले गावातील या शाळेत रहातात पण तरिही या संस्थेचे अध्यक्ष श्री भाऊ शेट्ये,बापू गवाणकर ईतर पदाधिकारी शाळेचे शिक्षक हे या मुलांसाठी खुप मेहनत घेतात अगदी शाळेतील मुलांना चप्पल पासून सर्व शैक्षणिक साहित्य आपल्या मित्रांच्या मदतीने देत असतात मुलांच्या स्नेहसंमेलन आणि अल्पोपहाराचा खर्च देखील मित्र देत असतात अशा बिकट परिस्थिती असूनही ही शाळा गरीब मुलांसाठी चालू ठेवल्याचं भाऊ शेट्ये यांनी सांगितले एवढ असूनही शाळेतील शिक्षक मुलांना अतिशय चांगले शिक्षण देत आहेत त्याची प्रचीती म्हणजे या शाळेचा दहावीचा निकाल १००% लागतो याशिवाय ९०% मार्क मुलांना मिळतातच पण तरीही या परिसरातील मुल शहरातील शाळेत घालतात याच आश्चर्य वाटते आणि म्हणूनच मी गौरांगला आग्रह केला कि आपण हे दोन काॅम्प्यूटर अशा शाळेला देवूया ज्यांना खरी गरज आहे आज ते देताना गौरांगलाही प्रचंड आनंद झाला शाळेचे मुख्याध्यापक श्री नाईक सर पंडीत मॅडम जाधव या सर्वांनी आभार मानले.