
सिंधुदुर्गात लवकरच ‘भजन सदन’ उभारणार…! — पालकमंत्री नितेश राणे.
सिंधुदुर्ग. – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन कलेला वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्ह्यात लवकरच ‘भजन सदन’ उभारण्यात येईल अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.
जिल्हा भाजपा आणि भजनी कलाकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन राणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलतांना त्यांनी वरील घोषणा केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही भजन स्पर्धा आयोमाजित करण्यात आली होती. जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत, भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष बुवा संतोष कानडे,सुरेश सावंत, संजय वेंगुर्लेकर, मोहन सावंत, प्रकाश पारकर आदी यावेळी उपस्थित होते.
भजनाच्या माध्यमातून हिंदुत्वाचे विचार मांडण्याचे ते लोकांपर्यंत नेण्याचे काम भजनी कलाकार करत असतात हे लक्षात घेऊन आमचं सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी सर्व भजनी काळाकारांना दिली. या भजन स्पर्धेत जिल्ह्यातील ३५ भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे.
‘सी. टी. स्कॅन’ चे उदघाटन कणकवली उप -जिल्हा रुंग्णालयात सुरु करण्यात आलेल्या सी. टी. स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण आज राणे यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी अनिल पाटील,जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील,रुंग्णालयाचे अन्य डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते. ही सेवा मोफत असून त्याचा लाभ सिंधुदुर्गवासीयानी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री राणे यांनी यावेळी केले.