
राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. मंगेश जतकर.
. दापोली तालुक्यातील आपटी येथील दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. महेश रमेशचंद्र जतकर यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.डॉ. जतकर हे दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगात निवड होण्यापूर्वी ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळ याचे सदस्य होते. तसेच ते होमिओपॅथी शैक्षणिक विभागात जून २०२२ ते जून २०२५ या कालावधीमध्ये कार्यरत होते. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत मोकल, प्राचार्य डॉ. चेतना गोरिवले आदींनी त्यांचे अभिनंदन केले.www.konkantoday.com