
रत्नागिरी शहरातील जेलरोड परिसरात गॅस जोडणीचे काम रखडले.
रत्नागिरी शहरातील जेलरोड परिसरात स्वयंपाकाच्या गॅसजोडणीसाठी रस्ता खोदण्याविषयी कंपनीने मागणी केली आहे. परंतु डांबरीकरण झालेले रस्ते वारंवार उखडणे शक्य नसल्याचे नगरपरिषदेने सांगितले आहे. नगर परिषद अभियंता यतीराज जाधव म्हणाले, डांबरीकरण झालेले रस्ते वारंवार उखडणे शक्य नाही. गॅस कंपनीने त्यांचे पूर्व नियोजन करून त्यांचे पैसे भरणे अपेक्षित होते. आता पावसाळ्यानंतर त्यासंदर्भात विचार करता येईल. अनेक महिन्यापूर्वी जेलरोड परिसरातील अपार्टमेंटमधील रहिवाशांनी कंपनीकडे पैसे भरून गॅसजोडणीची मागणी केली होती. गॅसवाहिनीचे काम पूर्ण न झाल्याने लोकांना जोडणी मिळू शकली नाही. कंपनीकडे चौकशी केली असता कंपनीने सांगितले की यासंदर्भात काही प्रश्न आहेत त्यावर काम सुरू आहे.www.konkantoday.com