
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहर मंडळ येथे उत्स्फूर्त रक्तदान शिबिर पार पडले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भारतीय जनता पार्टी शहर मंडळातर्फे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात एकूण ६१ महिला पुरुष रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.या वेळी महिला मोर्चा, युवा मोर्चा, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महिला मोर्चाच्या अध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या रक्तदानाने झाली. विशेष म्हणजे अनेक महिलांनीही रक्तदान करून समाजाप्रती आपले योगदान दिले.या उपक्रमामुळे सामाजिक जाणीवेतून प्रेरित होऊन जनतेमध्ये सेवा आणि बांधिलकीची भावना बळकट होत असून, संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली यामध्ये विशेष आभार संदीप उर्फ बाबू सुर्वे निलेश आखाडे विक्रम जैन व आपल्या ऑफिसचे मयेकर यांचे मोलाचे योगदान लाभले.