मान. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एस. टी. महामंडळाकडून गणेशभक्तांना ३०%प्रवास भाडे वाढीची भेट. गणेश भक्त कोकणवासीय प्रवाशी संघ मुंबई कार्याध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केला जाहिर निषेध.

आबलोली : . गौरी- गणपती सणासाठी ग्रुप पद्धतीने आपापल्या गावात जाणाऱ्या गणेश भक्त प्रवाशांसाठी एस. टी. महामंडळाने ३०% प्रवासी भाडेवाढ केली, त्याचा गणेश भक्त कोकणवासिय प्रवासी संघाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. महाराष्ट्र शासनाने *”गणेशोत्सव”* *”महाराष्ट्र उत्सव”* म्हणून जाहीर केला. आपला *”गणेशोत्सव”* कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या करीता मुंबईतील सर्व सामान्य चाकरमानी एस. टी. ने ग्रुप पद्धतीने आपल्या गावी जात असतो. पारंपरिक पद्धतीने आनंदात उत्साहात गौरी- गणपती सण साजरा करतो.

अश्या गणेशभक्तांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून ह्या वर्षी शासनाने ५००० जादा एस. टी. गाड्या सोडण्याची घोषणाही केली आहे, तर एस. टी. महामंडळाने ३०% प्रवासी भाडे वाढ केली आहे. हा कीती विरोधाभास आहे. मान. मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांनी गणेश भक्तांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून आणि सर्वसामान्य गणेशभक्तांचा *”गौरी-गणपती”* सण, महाराष्ट्र सरकारला अपेक्षित असलेला *”महाराष्ट्र गणेशोत्सव”* आनंदात, उत्साहात साजरा व्हावा अशी प्रामाणिक इच्छा असल्यास एस. टी. महामंडळाने केलेली ३०% प्रवासी भाडेवाढ रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती दिपक मा. चव्हाण कार्याध्यक्ष गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई यांचे वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button