
दापोली वन्यजीव रक्षकांची दापोली वनविभागा विरुद्ध आज 15 ऑगस्ट पासून काम बंद ची हाक
*दापोली वन्यजीव रक्षक यांनी दापोली वनविभागा विरुद्ध आज 15 ऑगस्ट पासून काम बंद ची हाक दिली असल्याची माहिती वन्यजीव रक्षक तुषार महाडिक यांनी दिली
दापोली तालुक्यातील वन्यजीव रक्षक कासव ,खवले मांजर, साप ,पक्षी अशा विविध पक्षी प्राण्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र झटत असतात. मात्र अचानक आज 15 ऑगस्ट पासून त्यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे आधीच धोक्यात आलेले वन्यजीव आणि त्यामुळे ढासळत चाललेले निसर्ग चक्र यांच्या संवर्धनाचा प्रश्नही गडद होणार आहे.




