माधवी रामचंद्र गोणबरेचा आमदार भास्कर जाधव यांनी केला गौरव.

आबलोली : जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारत देशासाठी अनेक सुवर्ण पदके पटकावणारी मुंबई अंधेरी येथे सध्या वास्तव्यास असलेली, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र आंबेकर यांची भाची आणि गुहागर तालुक्यातील खोडदे गोणबरे वाडीची सुकन्या माधवी रामचंद्र गोणबरे हिचा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुहागर विधानसभा मतदारसंघ मर्यादित मुंबई विरार येथील सखुबाई भास्कर मंगल कार्यालय मनवेलपाडा, विरार (पूर्व) येथे लोकनेते भास्कर जाधव गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. माधवी गोणबरे हिने स्पर्धेत आतापर्यंत सन २०१७ मध्ये सुवर्णपदक, २०१८ मध्ये सुवर्ण पदक, २०१९ मध्ये रौप्य पदक, २०२२ मध्ये सुवर्ण पदक, २०२३ मध्ये रौप्य पदक आणि २०२४ मध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत. देशासाठी खेळणारी गुहागर तालुक्यातील खोडदे गोणबरे वाडी येथील माधवी रामचंद्र गोणबरे हिचा आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून गौरव करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव यांच्यासह शिवविद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीचे विजय कदम, आय.बी.एस.सी. अकॅडमीचे संचालक आणि उपनेते प्रशांत राणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज देशमुख, विरार शहर प्रमुख उदय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button