
मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतिय अट्टल गुन्हेगार, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती.
कल्याणमधील रुग्णालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला परप्रांतीय व्यक्तीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत तरुणीच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. अशातच आता या तरुणीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीबाबत पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
*कल्याणमधील तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. प्रकाश झा या व्यक्तीने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारले होते, तसेच तिला जमिनीवर फरपटले होते. यामुळे तरुणीच्या मानेला आणि छातीला इजा झाली होती. अशातच आता पोलिसांनी प्रकाश झा नावाचा व्यक्ती अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती दिली आहे. या व्यक्तीवर याआधी 3 गुन्हे दाखल झालेले आहेत, अस पोलिसांनी म्हटले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ झा या व्यक्तीवर 3 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कोळसेवाडी, विठ्ठलवाडी आणि मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणं, हत्यार वापरणं असे गंभीर गु्न्हे गोकुळ झा याच्यावर दाखल आहेत. आता आरोपीच्या घरच्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहितीपीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जानकी हॅास्पिटलचे डॉक्टर मोईन शेख यांनी म्हटलं की, तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. तिला मान हलवताना खुप वेदना होत आहे. तसेच तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. मात्र मारहाणीमुळे तिला पॅरेलॅसिस होवू शकतो. तिला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.मनसे आक्रमकया घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेऊन बदला घेण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत बोलताना जाधव यांनी म्हटले की. मुलीची परिस्थिती वाईट आहे. त्या मुलीला लाखा बुक्क्याने भरपूर मारले आहे. 24 तास ती त्याच दुःखात घरी बसून होती. पोलिसांना विनंती याला लवकरात लवकर अटक करावी. नाहीतर तो आमच्या हाताला लागला तर आम्ही देखील त्याने त्या मुलीवर हात उचलला तसा हाताचा वापर करू.