
खेड तालुक्यातील लोटेतील लासा कंपनीसमोर कामगारांचे बेमुदत उपोषण.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत लासा सुपरजेनेरिक्स कंपनी मालकाने अचानक बंद केल्याने कंपनीत काम करणार्या कामगारांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याचा आरोप करत या निषेधार्थ आक्रमक कामगारांनी २१ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.लासा सुपरजेनेरिक कंपनीला मालकाने १७ जुलै रोजी प्रवेशद्वाराला आतून कुलूप घालून कामकाज अचानक बंद केले. कारखान्याच्या व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर येणार्या कामगारांना कामावर येण्यास अटकाव केला होता. आम्ही कारखाना बंद करत आहोत. तरी तुम्ही कामावर येवू नका. या अचानक लावलेल्या नोटीसीमुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.www.konkantoday.com