
कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या तरूणाचा रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीस.
कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या तरूणाचा अज्ञात चोरट्याने १६ हजार किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री २.३० ते ६.३० या वेळेत घडली. याबाबतची फिर्याद विशाल केरू कांबळे (३५) यानी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल हा रेल्वेने रत्नागिरी ते चिपळूण रेल्वेस्टेशन असा रेल्वे गाडीने प्रवास करत होता. यावेळी १६ हजार किंमतीचा मोबाईल त्याने चार्जिंगला लावलेला होता. हा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार विशाल याच्या लक्षात आल्यानंतर त्याने याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com