कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून चिपळूणातील तरुणाचा मृत्यू

कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस मधून तोल जाऊन खाली पडल्याने राहुल संतोष सावर्डेकर (२९, रा.चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) हा युवक मृत्युमुखी पडला. ही घटना कणकवली आणि नांदगाव रेल्वे स्थानकादरम्यान जानवली येथे मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.राहुल सावर्डेकर हा कोकणकन्या एक्सप्रेसचा जनरल बोगीमधून प्रवास करत होता. प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा दरवाजा जवळ तोंड धुत होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो रेल्वेच्या बाहेर पडला. यावेळी तो एका दगडावर जोरदार आपटला यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मृत्यूमुखी पडला. दरम्यान या घटनेची माहिती कोकणकन्या एक्सप्रेसचा लोकोपायलटने कणकवली रेल्वे स्थानक येथे स्टेशन मास्तर यांना दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक निरीक्षक दुर्गेश यादव घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे राहुल याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button