
किल्ले रायगडावर पायरी मार्गावरील निर्बंध अखेर शिथिल, शिवप्रेमींमध्ये आनंद व्यक्त.
किल्ले रायगडावरील पायरी मार्ग १५ ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी पारित केले होते. मात्र पायरी मार्गावरील निर्बंध शिथील करण्यात आले असून आता केवळ रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी झाल्यानंतरच पायरी मार्ग बंद राहणार आहेत. या नव्या निर्णयामुळे शिवप्रेमींसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.अतिवृष्टीचा धोका लक्षात घेत दगडी कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी होवू नये, याकरिता पायरी मार्ग १५ जुलैपासून पर्यटकांसह सर्व नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र पायरी मार्ग बंद झाल्यामुळे होणारी गैरसोय अन स्थानिकांच्या मागण्या लक्षात घेत रायगड जिल्हा प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुधारित आदेश पारित केले आहेत.www.konkantoday.com