
काका-काकीच्या खुनाच्या आरोपातील पुतण्याला उच्च न्यायालयाने अखेरीस सहा वर्षानंतर २५ हजारचा जामीन मंजूर केला.
लांजा तालुक्यातील व्हेळ गावातील घटनेत काका-काकीच्या खुनाच्या आरोपातील पुतण्याला उच्च न्यायालयाने अखेरीस सहा वर्षानंतर २५ हजारचा जामीन मंजूर केला. सहा वर्षानतंतर जामिनासाठी केलेल्या प्रयत्नामुळे रत्नागिरी लोक अभिरक्षक कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.ही घटना ९ मार्च २०१९ ला सकाळी दहा वाजता घडली होती. प्रतीक चंद्रकांत शिगम असे आरोपीचे नाव आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक (न्यायरक्षक) कार्यालय-रत्नागिरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा आवडीची गाणी ऐकत असताना चूकून आवाज मोठा झाला. काका एकनाथ शिगम व त्यांची पत्नी वनिता शिगम या दोघांनी त्याला अश्लिल शिवीगाळ केली आणि भांडण सुरु झाले.
आरोपी व काका-काकी यांच्या ढकला ढकली झाली. एकमेकांना दगड फेकून जखमी केले. काका-काकी यांनी घटनास्थळी गडग्यावर, वाटेवर पडून गंभीर दुखापती झाल्या आरोपीला पण डोक्यात रक्ताळलेली जखम झाली. थोड्या कालवाधीत काका-काकीचा जाग्यावर मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी औषधोपचार केला वयस्क व्यक्तींचा मृत्यू झाला. म्हणून आरोपी (वय २१) यांच्यावर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन भादवी कलम ३०२ अन्वेय खटला दाखल केला.आरोपी अटक केल्या दिवसापासून सहा वर्षे जेलमध्ये होता. तथापी जलद सुनावणी पूर्ण झाली नाही. आरोपीचे वय घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमुर्ती अस्वीन डी. भोबे यांनी आरोपीचा सोमवारी (ता. ९) जामीन अर्ज मंजूर केला.
अटिशर्ती मधील आरोपीला कोर्ट सुनावणी तारखा व्यतीरिक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला. याकामी रत्नागिरी विधीसेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड. अजित एम वायकूळ यांनी योग्य पद्धतीने जामीनासाठी प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयातील विधी सेवा समितीकडे पाठवून पाठपूरावा करुन तेथील उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्या बचाव पक्षाचे वकिल अॅड. अजित सावगावे यांनी बाजू मांडली. अखेरीस न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.