
संगमेश्वर तालुक्यातील चित्रकार गुरूदेव बारगोडे यांची चित्रे प्रद्योत आर्ट गॅलरीत.
संगमेश्वर तालुक्यातील चित्रकार गुरूदेव बारगोडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन प्रद्योत गॅलरी, टीआरपी, रत्नागिरी येथे दि. २१ जुलै ते २७ जुलै या दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलारसिकांना पाहता येईल. या प्रदर्शनाचा रत्नागिरी जिल्ह्यातील कला रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रद्योत आर्ट गॅलरीच्या क्युरेटर मयुरी घाणेकर यांनी केला आहे.बागोडे यांची कला ही शरीराच्या बाह्य रूपावर नव्हे तर त्याच्या अंतर्गत आठवणींवर, भावना आणि विधींच्या अनुभवांवर आधारित आहे. त्यांच्या चित्रातील आकृती या शारिरीक वास्तव्याच्या प्रती नाहीत, तर त्या एका अंतर्मनातून झालेल्या अनुभूतीची चित्रे आहेत. त्यांनी रेखाटलेली दीक्षा ही चित्र मालिका एक प्रवास मांडते. अदृश्य सीमारेषा पार करताना होणार्या बलांचा यात वेदना, ओढ, संघर्ष आणि स्वतःची ओळख या सार्या गोष्टी एकत्र येतात.गुरूदेव बारगोडे चित्र रेखाटतात तेव्हा ते क्षणिक प्रेरणेवर आधारित असते. रेषा आणि रंग त्यांना मार्गदर्शन करतात. काही वेळा आकृती नृत्यासारखी वाहते. तर कधी ती विरोध करते. रंगसंगती ही कमीत कमी ठेवलेली असूनही ती खोलवर जाणारी आहे. एक अनाम व्यक्त होणार्या भावनांचा स्पर्श देणारी त्यांची कलाकृती आहे.www.konkantoday.com




