
रूंदीकरणास अडथळा ठरणार्या दापोली ते विसापूर रस्त्यावरच्या ४०७ झाडांचे होणार प्रत्यारोपण.
दापोली ते विजापूर मार्गावरील रस्त्यांच्या रूंदीकरणास अडथळा ठरणार्या तब्बल ४०७ झाडांचे कटींग करून त्यांचे प्रत्यारोपण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सदर वृक्षांचे कटाई व प्रत्यारोपणाचे काम एका नामांकीत कंपनीला देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या झाडांचे मुळासकट प्रत्यारोपण करून पुढील तीन वर्षे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी या कंपनीने घेतली आहे.ठेकेदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार झाडे उचलताना त्यांची काळजीपूर्वक मुळे काढून ती नवीन जागी लावली जात असून योग्य त्या औषधोपचारांसह खतपाणी देण्यात येत आहे. या कंपनीने याआधी पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेने प्रत्यक्ष पाहणी दरम्यान काही गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. प्रत्यारोपण प्रक्रियेत झाडे मुळासकट काढून लगेच लावणे आवश्यक असताना काही झाडे तशीच पडून राहिल्याचे दिसून आले. काही वेळाने किंवा दुसर्या दिवशी ती लावली जात असल्याचे चित्र दिसल्याने या प्रत्यारोपणाचे भविष्य कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com




