
रत्नागिरीतील राजिवडा येथील बांग्लादेश झोपडपट्टी नावाचा उल्लेख काढून श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग राजिवडा करावा. शिवसेनेची मागणी
: रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादररत्नागिरी : पूर्वीपासून उल्लेख करण्यात येणारा राजिवडा पुलाखालील परिसरातील बांग्लादेश परिसर किंवा बांग्लादेश झोपडपट्टी या नावाचा उल्लेख काढून टाकावा तसेच गिरोबा चौक तळ्याजवळ तेली आळी, रत्नागिरी ते श्री देव काशी विश्वेश्वर मंदिर, राजिवडा या परिसराचा श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग राजिवडा असा उल्लेख करावा, अशी मागणी रत्नागिरी शिवसेनेने केली.यासंदर्भात रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) तथा रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह सुदेश मयेकर, महेश म्हाप, सुहेल मुकादम, बिपिन बंदरकर, विकास पाटील, प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, संजय साळवी, विजय खेडेकर, संजय हळदणकर आदी उपस्थित होते. “पूर्वीपासून रत्नागिरी शहरातील राजिवडा पुलाखालील परिसराला लागून असलेल्या काही परिसराचा उल्लेख हा दैनंदिन जीवनामध्ये व्यावहारीक भाषेत बांग्लादेश परिसर किंवा बांग्लादेश झोपडपट्टी अशा आशयाने केला जात आहे. गिरोबा चौक तळ्याजवळ तेली आळी, रत्नागिरी ते श्री देव काशी विश्वेश्वर मंदिर, राजिवडा या परिसराचा श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग राजिवडा असा उल्लेख करावा, अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.