
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कोकणासाठी फक्त १२ फेर्यांचे नियोजन केले.
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेने आतापर्यंत २४६ गणपती स्पेशल फेर्यांचे नियोजन करत चाकरमान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पुणे विभागातून केवळ १२ फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे पुणेस्थित चाकरमान्यांना गणेशोत्सवात गाव गाठताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला कोकणचे इतके वावडे का? असा प्रश्नही पुणेस्थित गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.गणेशोत्सव दीड महिन्यांवर येवून ठेपला आहे. मुंबईसह पुणेस्थित चाकरमान्यांनी गणेशोत्सवात गावी येण्याकरिता आतापासूनच नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने गणपती स्पेशल गाड्यांकडेच चाकरमान्यांच्या नजरा खिळल्या होत्या. दोनच दिवसांपूर्वी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने २४६ फेर्या जाहीर करत चाकरमान्यांना सुखद धक्का दिला आहे. येत्या चार दिवसातच जाहीर केलेल्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. मध्य रेल्वे पुणेस्थित चाकरमान्यांना गावी येण्याकरिता केवळ दोन गणपती स्पेशलच्या १२ फेर्या जाहीर केल्या आहेत.www.konkantoday.com




