
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी कोकण मार्गावर दिवा-चिपळूण मेमूच्या धावणार ३८ फेर्या.
मध्य व पश्चिम रेल्वेसह कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांवर गणपती स्पेशल गाड्यांच्या फेर्यांची खैरात करण्यास सुरूवात केली आहे. यंदाही कोकण मार्गावर दिवा-चिपळूण अनारक्षित स्पेशल चालवण्यात येणार आहे. या स्पेशलच्या २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत नियमितपणे ३८ फेर्या धावणार असल्याने चाकरमान्यांनी कमालीचे सुखावले आहेत.गणेशोत्सवात कोकण मार्गावर चालवण्यात येणार्या दिवा-चिपळूण मेमू अनारक्षित स्पेशलच्या फेर्यांना गणेशभक्तांचा उदंड प्रतिसाद लाभतो. रेल्वे प्रशासनाच्या निजोरीतही तितकीच भर पडते. गणेशभक्तांनाही कमी खर्चात गाव गाठण्याचा मार्ग सुलभ होतो. यंदाच्याही गणेशोत्सवात दिवा-चिपळूण मेमू स्पेशलच्या फेर्या धावणार असल्याने प्रतीक्षा यादीवर असणार्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. ०११५५-०११५६ क्रमांकाची दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल गणेशोत्सव कालावधीत नियमिपणे धावणार आहे. दिवा स्थानकातून सकाळी ७.१५ वाजता सुटून चिपळूण येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुरू होवून दिवा स्थानकात रात्री १०.५० वाजता संपेल. ८ डब्यांच्या मेमू स्पेशलला निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जीते,हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, वीर, सापे, बामणे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड आणि अंजणी रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.www.konkantoday.com