
खेड शहरातील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह २७ पासून रसिकांच्या सेवेत.
खेड शहरातील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचा वाढदिवसाचा मुहुर्त साधून २७ जुलैपासून नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. साडे अकरा कोटी रुपये खर्चून सर्व सोयीसुविधांयुक्त सुसज्ज अशा नाट्यगृहाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. तब्बल १९ वर्षानंतर नाट्यगृहाचा पडदा उघडणार आहे. यामुळे नाट्यरसिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.शरातील सांस्कृतिक चळवळीला उभारी देवून, नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कल्पनेतून अद्ययावत नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती. सुरूवातीची काही वर्षे वगळता त्यानंतर नाट्यगृहाच्या देखभालीसह दुरूस्तीकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने पडदा कायमचाच बंद झाला. तब्बल १९ वर्षापासून बंदावस्थेत असलेल्या नाट्यगृहाच्या दुरूस्तीच्या नावाखाली प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला होता.तरी देखील नाट्यगृहाची घंटा वाजलीच नाही. आज ना उद्या नाट्यगृह खुले होवून मनोरंजन होईल, या रसिकांच्या आशेवर वर्षानुवर्षे पाणीच फेरले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांना खासगी सभागृहाचाच आधार घ्यावा लागत होता. यासाठी नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. बंदावस्थेतील नाट्यगृह खुले करण्यासाठी योगेश कदम आमदार असताना शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला.www.konkantoday.com