
क्रेडाई रत्नागिरीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम!
क्रेडाई रत्नागिरी संस्थेतर्फे सिद्धिविनायक नगर, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी वैभव गारवे (मुख्याधिकारी, नगरपरिषद, रत्नागिरी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.क्रेडाई संस्थेकडून दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येतो.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि आपल्या रत्नागिरी शहराला अधिक हिरवेगार बनवण्यासाठी क्रेडाई रत्नागिरी संस्थेकडून दरवर्षी सुमारे २०० झाडे रत्नागिरी शहरात लावण्यात येतात.या वेळी क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. महेश गुंदेचा, सेक्रेटरी श्री. प्रदीप कट्टे, खजिनदार श्री. महावीर जैन, माजी अध्यक्ष श्री. नित्यानंद भुते, क्रेडाई महाराष्ट्र सह संयोजक श्री. दीपक साळवी आणि पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सोबतच क्रेडाई रत्नागिरी महिला विंग आणि युथ विंगच्या सदस्यांनी यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते