
आम आदमी पार्टी खोपोली नगरपरिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार.
नवीन सदस्यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षाला मिळाली ताकद आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाब मध्ये उत्कृष्ट असे काम करून आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका लढणार आहे त्या अनुषंगाने आज खोपोली शिळफाटा येथील हनुमान मंदिर सभागृहामध्ये शहरातील तरुणांनी आम आदमी पार्टी मध्ये पक्षप्रवेश केला. परमेश्वर कट्टीमनी यांना खोपोली शहर उपाध्यक्ष, महेश कांबळे यांना कामगार आघाडी अध्यक्ष, दिलावर शेख यांना अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष, सिमरन काजळे यांना महिला आघाडी अध्यक्ष, शहबाज अन्सारी यांना मीडिया आघाडी अध्यक्ष तर गीता कर्णुक यांना महिला आघाडी उपाध्यक्ष अशाप्रकारे खोपोली शहरातील विविध पदांच्या नियुक्त्या आम आदमी पार्टी खोपोली शहराचे अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांच्यातर्फे करण्यात आलेल्या आहेत. तसेच इतर 20 नवीन सदस्यांनी आम आदमी पार्टी मध्ये स्वेच्छेने पक्ष प्रवेश केला.आज खोपोली मध्ये आम आदमी पार्टीचे होणारे काम पाहून युवावर्ग उत्साहीत झालेला असून तो स्वतःहून पक्षामध्ये प्रवेश करत आहे. आम्ही येणाऱ्या काळात खोपोली मध्ये उत्कृष्ट अशा शाळा, उत्कृष्ट हॉस्पिटल, कचरामुक्त खोपोली, अशा आमच्या संकल्पना आहेत व ते आम्ही साकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी जास्तीत जास्त लोकांनी आम आदमी पार्टीमध्ये आमच्याबरोबर यावे व आमच्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वजण मिळून काम करू व खोपोलीला नक्कीच एक उत्कृष्ट असे शहर बनवू असे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.सदर कार्यक्रमा करिता आम आदमी पार्टी रायगड जिल्हा संघटन सचिव श्री चिमाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, खोपोली शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, प्रभाग क्रमांक पाचचे अध्यक्ष भगवान पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे यांनी केले.