
लाखाे रुपये खर्चुनही देवरूख येथील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बंद अवस्थेत.
शासनाच्या अनेक इमारती सरकारी निधीमधून बांधूनही त्याचा वापर हाेत नसल्याने त्यांची दुरावस्था हाेण्याची अनेक उदाहरणे असून आता देवरुख शहरातील जिल्हा परिषद कर्मचाèयांसाठी लाखाे रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या इमारतीचीही तशीच अवस्था झाली आहे. सन 2019 मध्ये कर्मचाèयांच्या या निवासस्थानाच्या छप्पर दुरूस्तीसाठी व अन्य कामासाठी अंदाजे पावणे तीन लाख रुपये खर्च करण्यात आले मात्र त्या इमारतीत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याचे कर्मचाèयांचे म्हणणे आहे त्यामुळे त्या निवासस्थानात काेणीही रहाण्यास गेले नाही. मात्र देवरूख ग्रामीण रूग्णालयाची नवीन इमारत बांधण्याचे काम चालू असताना 2 वर्षे या इमारतीतून रूग्णालय सुरू ठेवण्यात आले हाेते. रूग्णालयाची नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर रूग्णालयाचे स्थलांतर करण्यात आले मात्र ही इमारत आता परत पडीक अवस्थेकडे जात आहे. त्यामुळे सरकारी निधीचा दुरूपयाेग हाेत आहे.www.konkantoday.com




