
रेशन दुकानदारांना दिलासा, थकित कमिशनसाठी निधी उपलब्ध.
रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन थकले असून याबाबत रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशाेक कदम व खजिनदार रमेश राणे यांनी याबाबत लक्ष घालून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून रेशन दुकानदारांची कमिशनबाबतची समस्या मांडली हाेती. कमिशन वाढवावे तसेच धान्य वाहतुकीच्या फरकाची रक्कम परत मिळावी, तसेच अतिरिक्त कामाचा माेबदला द्यावा अशा मागण्या मंत्री भुजबळ यांच्यासमाेर मांडण्यात आल्या हाेत्या. याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्रीमहाेदयांनी देवून सध्या रेशन दुकानदारांच्या थकित कमिशनसाठी अर्धा निधी पुरवठा विभागाकडे देण्यात आला असून उर्वरित निधी लवकरच देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.www.konkantoday.com