मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवस निमित्ताने भारतीय जनता पार्टी व जय हो प्रतिष्ठानकडून शालेय गणवेश वाटप, व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे प्रभाग क्रमांक ०६ मध्ये आयोजन..

रत्नागिरी : जय हो प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शालेय गणवेश व साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले असून. रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मधील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप व शालेय साहित्य वाटप असा कार्यक्रम उद्या दिनांक २२ जुलै रोजी सायं. ५:३० वाजता आयोजित केला आहे. जय हो प्रतिष्ठान, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब व आयटी जिल्हाप्रमुख निलेश आखाडे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, जय हो प्रतिष्ठानचे प्रमुख राजू भाटलेकर व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी दामले विद्यालय समोर जोगळेकर हॉल येथे उद्या सायं. ५:३० वाजता उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button