
भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर अंत्यविधीनंतर धार्मिक विधी करण्याची शेड काेसळली.
रत्नागिरी शहरानजिकच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर अंत्यविधीनंतर धार्मिक विधीसाठी शेड उभारण्यात आली हाेती. मात्र ही शेड सध्या काेसळली आहे. या शेडचा वापर पावसाळ्यात अंत्यविधी व पिंडदान आदी धार्मिक कार्यासाठी केला जात हाेता. मात्र ही शेड आता जमीनदाेस्त झाली असून त्यामुळे भर पावसात नागरिकांना उघड्या भागात धार्मिक विधी करावे लागत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने तातडीने ही शेड उभी करावी अशी नागरिकांची मागणी आहे.www.konkantoday.com