दारू महागली, विक्री कोसळली; आता १५० मि.ली. बॉटलची मागणी! क्वार्टर नको, दीडशे मिलीच करा!करवाढीमुळे बाटलीतील मद्य कमी करण्याची मागणी!!


मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या धोरणामुळे मद्याच्या दरात वाढ झाली आहे; मात्र या दरवाढीमुळे बार, रेस्टॉरंट मधील मद्यविक्रीत तब्बल ३० टक्के घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर तोडगा म्हणून जवळपास १५० मद्य उत्पादक कंपन्यांनी १८० मिलीऐवजी (क्वार्टर) १५० मिलीची बाटलीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. या प्रस्तावावर राज्य सरकार कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने सचिवस्तरीय अभ्यासगट स्थापन केला होता. या गटाने इतर राज्यातील मद्य धोरणांचा, कररचनेचा आणि अनुज्ञप्ती प्रणालीचा अभ्यास करून सरकारला अहवाल सादर केला. त्यानुसार उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने देशी व विदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात लक्षणीय वाढ केल्यानंतर आयएमएफएल (इंडियन मेड फॉरेन लिकर) मद्यावरील कर ४.५ पट वाढला आहे. त्यामुळे १८० मिलीच्या क्वार्टरची किंमत १६० रुपयांवरून २२० रुपये, तर प्रीमियम ब्रँड्सची किंमत ३६० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहक आणि मद्यविक्रीवर झाला आहे.

*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button