
चक्क शाळेसमाेरच दिसला गव्यांचा कळप, विद्यार्थ्यांच्यात घबराटीचे वातावरण.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात सध्या गव्या रेड्यांचे दर्शन हाेत असून आता गुहागर तालुक्यातील मांडवकरवाडी येथे चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेसमाेरच भल्यामाेठ्या गव्याचे दर्शन घडले आहे. शाळेसमाेरच गवा दिसल्याने सर्वांनी उत्सुकतेपाेटी गव्याचे ाेटाेही काढले. मात्र या परिसरात गव्याचा वावर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांचे दृष्टीने हे धाेकादायक ठरणार आहे. या भागात गव्याचा कळप संचार करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वनविभागाने याबाबत याेग्य ती कारवाई करावी अशी मागणी हाेत आहे.www.konkantoday.com