
रत्नागिरीतील एसटी बसस्थानकाचे काम रेंगाळले, प्रवाशांची गैरसोय सुरूच
मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या रत्नागिरी शहरातील हायटेक बस स्थानकाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळले असून या कामाबाबत एसटी प्रशासन मंडळाकडूनही फारसा पाठपुरावा केला जात नसल्याने हे काम पूर्ण होण्यास आणखी काही वर्ष लागणार असे दिसत आहे. व्यापारी संकुलासह या ठिकाणी अत्याधुनिक एसटी स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे पुर्वीच्या इमारती पाडून एका बाजूने बसस्थानकाच्या कामाला म्हणजे खोदाईला सुरूवात झाली होती परंतु त्यानंतर हे काम मात्र रेंगाळले. कोरोना व लॉकडावूनचा फटका बसल्याने हे काम ठप्प झाले. ठेकेदाराच्या झालेल्या कामाचीही काही लाख रुपयांची रक्कमेचे बिल अद्यापही मिळालेले नाही. त्यातच आराखड्यात अचानकपणे बदल केल्याने ठेकेदार व महामंडळ यांच्यात कोणताही समन्वय राहिलेला नाही. यामुळे या कामाला अद्यापही जोर पकडलेला नाही. या सर्व गोष्टींमुळे बसस्थानकासमोरील रस्त्याच्या बाजूला भर उन्हात प्रवाशांना ताटकळत उभे राहून गाड्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे. याबाबत जर लक्ष घातले गेले नाही तर हे काम अनेक वर्ष रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com