
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे तब्बल १५ गवारेड्यांचा कळप आढळला.
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे तब्बल १५ गवारेड्यांचा कळप आढळून आला आहे. जंगलातून बाहेर आलेल्या या गवारेड्यांच्या कळपामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या कळपाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र एवढ्या संख्येने गवे एका ठिकाणी दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.कोलगाव परिसरात एका वेळेस एवढ्या मोठ्या संख्येने गवे बाहेर आल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. गावालगत असलेल्या शेतात हा कळप उतरला होता. काही वेळ तेथेच थांबून पुन्हा जंगलाच्या दिशेने ते निघून गेले.