
“कांचन डिजिटल”तर्फे दिवाळीत “किल्ले बांधणी स्पर्धा”
- छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेद्वारे मानवंदना
- आयोजक कांचन मालगुंडकर यांच्यातर्फे घोषणा
रत्नागिरी :- रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या “कांचन डिजिटल फोटो”ने वैविध्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रम राबवून रत्नागिरी शहरात एक वेगळा ठसा उमटविला आहे. आता दिवाळीतही एक नवा उपक्रम, एक नवी स्पर्धा “कांचन डिजिटल फोटो”तर्फे आयोजित करण्यात आळी आहे. दिवाळी म्हटले की किल्ले बनविणे हे समीकरण आलेच, हाच धागा पकडून “कांचन डिजिटल फोटो”तर्फे “किल्ले बांधणी स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यासाठी, तसेच बच्चेकंपनी आणि युवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी व त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांप्रति आत्मियता जागृत होण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी सांगितले.
दिवाळीमध्ये बच्चेकंपनी आणि युवा लहान-मोठे किल्ले बनवतात. तर किल्ला बनवताना बच्चेकंपनी व युवांनी “कांचन डिजिटल फोटो”च्या किल्ले निर्मिती स्पर्धेला डोळ्यासमोर ठेवून उत्तम किल्ला बनवावा. ही स्पर्धा रत्नागिरी शहर मर्यादित असून तज्ज्ञ परीक्षकांतर्फे किल्ल्यांचे परीक्षण करण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार असून पहिल्या तीन नंबरमध्ये येणाऱ्या स्पर्धकांच्या किल्ल्यांचे “कांचन डिजिटल” टीमद्वारे आकर्षक चित्रीकरण करून कांचन मालगुंडकर यूट्यूब चैनलवर प्रदर्षित करण्यात येणार आहे.
तर मग “कांचन डिजिटल”च्या 9422576736 ह्या व्हाट्सअप नंबर आपली नावनोंदणी त्वरित करावी. या नंबरवर स्पर्धकाचे नाव व पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर ची नोंद करावी. नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर आहे. तरी या स्पर्धेत स्पर्धेकांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन कांचन मालगुंडकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.




