
शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट थॉमस स्कूलच्या आराध्य भरणकरचे सुयश.
रत्नागिरी दि.१९: कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूल शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या आराध्य समीर भरणकर याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मध्ये २९८ पैकी २१० गुण मिळविले. आराध्य याने रत्नागिरी तालुक्यामध्ये दहावा क्रमांक मिळविला. ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत १०९ वे स्थान मिळविले. आराध्य याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी त्याचे आई-वडील, शाळेतील शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृती परीक्षेतील आराध्यच्या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.