मुंबइ गोवा महामार्गावर बर्निग टॅंकरचा थरार !.

राजापूर तालुक्यातील पन्हळे माळवाडी येथील घटना केमीकल वाहुन नेणाऱ्या टॅंकरला भिषण आग , आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह !* मुंबइ गोवा महामार्गावर शनिवार दिनांक १९ जुन २०२५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहुन नेणाऱ्या टॅंकरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे . इतकी मोठी घटना घडुनही तालुक्याची आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा अथवा पोलिस यंत्रणा वेळेच न पोहोचल्याने येथील ग्रामस्थानी या मार्गावरील वाहतुक दुसऱ्या लेन वरुन सोडल्याने मोठा अनर्थ टळला आहे तर तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे .

शनिवारी सकाळी नउ वाजण्याच्या सुमारास गोव्यावृन मुंबईच्या दिशेने केमीकल वाहुन नेणारा सदर टॅंकर तालुक्याती पन्हळे माळवाडी येथे आला असता त्याला अचानक आग लागली . हवेत दुराचे लोट पसरल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली . स्थानिकानी घटनास्थळी धाव घेत लागलीच गोव्याहुन मुंबईच्या दिशेने असणारी वाहतुक थांबवुन ती दुसऱ्या एकेरी मार्गावरुन वळवली आहे .

या टॅंकरच्या चाकानीही पेट घेतला असुन हवेत दुराचे लोट उसळले आहेत . मात्र एक तासाहुन अधिक काळ लोटला तरी ही आग अटोक्यात आणण्यासाठी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेने कोणतीच हालचाल न केल्याने व अग्नीशमनयंत्रणाही न पोहोचल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . मात्र स्थानिकानी एकेरी मार्गावरील वाहतुक थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button