
सैनिकी मुलांचे वसतिगृह चिपळूण येथे २६ जुलै रोजी कारगिल दिवस.
रत्नागिरी, दि. १८ : भारतीय सैन्यांनी सन १९९९ मध्ये कारगिल सेक्टर मध्ये झालेल्या ऑपरेशन विजय मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरुध्द मिळविलेल्या विजयानिमित्ताने देशातील संपूर्ण नागरिक प्रत्येक वर्षाच्या २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करत असतात. या वर्षाचा कारगिल विजय दिवस दि. २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे साजरा करण्यात येणार आहे.
या समारंभामध्ये जिल्ह्यातील विर नारी, विरमाता, विर पिता यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील विर नारी, विरमाता, विर पिता, माजी सैनिक/विधवा यांनी सैनिकी मुलांचे वसतिगृह चिपळूण येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.000