
जमीन आरोग्य सुपीकता कार्यक्रमांतर्गत ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा.
रत्नागिरी, दि. ११ ):- केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राज्यात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील महत्वाचा घटक हा जिल्ह्यात ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा (व्हीएसटीएल) उभारणी करणे आहे. व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था, पीएसीएस, कृषी चिकित्सालय, कृषी व्यवसाय केंद्रे, माजी सैनिक, बचत गट, एसएचजी, शेतकरी सहकारी संस्था, निविष्ठा किरकोळ विक्रेते, शाळा/कॉलेज युवक/युवती यांनी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
ग्रामीण तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून गाव पातळीवर मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण करणे व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात दोन ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणी करण्यात येणार आहे. या अंतर्गत रक्कम १ लाख ५० हजार रुपये एका प्रयोगशाळा उभारणीसाठी एकदाच आर्थिक सहाय्य देय राहील व ३०० मृद नमुने तपासणी, मृद आरोग्य पत्रिका तयार करणे करिता आरकेव्हीवाय मधून प्रति नमुने ३०० रुपये देण्यात येतील. त्यापुढील ५०० नमुने तपासणी, आरोग्य पत्रिकेसाठी प्रति नमुना २० रुपये इन्सेटिव्ह देण्यात येतील. नंतर मृद नमुने तपासणी हे शासन मान्य दराने ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा (व्हीएसटीएल) करतील. अर्जदार/उद्योजक / गट यांच्याकडे किमान चार वर्षासाठी भाडेतत्वावर करारासह किवा स्वतः च्या मालकीची जागा, भाड्याची इमारत असावी. वैयक्तिक गाव स्तरावरील तरुण उद्योजक अर्ज करणार असेल तर त्या अर्जदाराचे वय १८ वर्ष पेक्षा कमी आणि २७ वर्षा पेक्षा जास्त नसावे. शिक्षण दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड छायांकित सत्यप्रत आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा मृद सर्वेक्षण प्रयोगशाळा येथे संपर्क साधावा.




