
लांजा नगर पंचायतीच्या प्रारूप शहर विकास योजना आराखड्याबाबत हरकतींवर ४ ऑगस्टपासून सुनावणी.
लांजा नगर पंचायतीच्या प्रारूप शहर विकास योजना आराखड्याबाबत आलेल्या हरकतींवर होणार्या सुनावणीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ४ ते ७ ऑगस्ट दरम्यान सुनावण्या होणार आहेत. या संदर्भात हरकती घेतलेल्या नागरिकांना पत्रव्यवहार करण्यास आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे.लांजा शहर प्रारुप विकास आराखडा २७ मार्च २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या आराखड्याबाबत हरकती घेण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल देण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या रोषामुळे १५ मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. अखेर मुदत संपल्यानंतर विकास आराखड्याविरोधात नगर पंचायतीकडे तब्बल १,५०० हरकती अर्ज आले होते.www.konkantoday.com