
रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 17 जुलै रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडली.
चंद्रकांत यशवंत तांबे (४०) आणि मृदुला वासुदेव वाडकर (६० दोन्ही रा. निवळी, रत्नागिरी) अशी विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरा पर्यंत याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.