
रत्नागिरीतील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा सुरू.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हे सिद्धतेमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने विविध शहरांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. मात्र या यंत्रणांची देखभाल आणि दुरुस्ती हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे.या पार्श्वभूमीवर विधानसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच एक प्रणाली आणि आदर्श कार्यप्रणाली जाहीर केली जाईल, अशी माहिती दिली. यामध्ये कॅमेर्यांचा वॉरंटी कालावधी, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी, फायबर कनेक्टिव्हिटीतील अडथळे, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांमधील समन्वय या बाबींचा समावेश असेल.रत्नागिरी रायगड व जिल्ह्यातील शहरी भागातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या दुरुस्तीबाबत आमदार रवीशेठ पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत प्रशांत बब, भास्कर जाधव, प्रशांत ठाकूर, महेश शिंदे आणि श्रीजया चव्हाण यांनी सहभाग घेतला. रत्नागिरीतील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या दुरुस्तीबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाने पाठपुरावा सुरू केला आहे.www.konkantoday.com