
येत्या २७ जुलै रोजी निलेश भगवान सांबरे देवरुखात; मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी विभाग मार्फत देवरुख येथे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.यासाठी शिवसेना उपनेते, जिजाउ संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे उपस्थित रहाणार आहेत. याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आलीयावेळी प्रकल्प समन्वयक संदिप पाटील, युयुत्सु आर्ते, सौ.रेवा कदम, साहिल रेवाळे, जितेंद्र राठोड , राजू धामणे आदि उपस्थित होते. देवरुख येथे हि सुविधा उपलब्ध होणार आहे. मोफत सुविधा असल्याने ग्रामिण भागातील मुला मुलींचे शिक्षण व उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.लवकरच आरोग्यसुविधाही दिल्या जाणार आहेत. देवरुखसाठी रुग्णवाहिका देण्याची घोषणा २७ तारखेला होण्याची शक्यता आहे.पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मैदान तसेच वाचनालयाची सोय केली आहे.तज्ञ मार्गदर्शकांची नेमणुक केली जाणार आहे.