
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण नवीन डेडलाईन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवी घोषणा.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १४ वर्षांपासून रखडले आहे. २०११ साली महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊनही अद्यापपर्यंत चौपादरीकरण पूर्ण झाले नाही. केंद्र तसेच राज्य सरकारमधल्या मंत्र्यांकडून वारंवार महामार्गाचे काम पूर्ण करण्याची तारीख जाहीर करण्यात येते. मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणांना अद्यापपर्यंत यश मिळालेले नसल्याचे विदारक चित्र दिसून येते. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी डिसेंबर २०२५ ही काम करण्याची दिलेली डेडलाईन चुकणार असून मार्च २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामाला नवी डेडलाईन देण्यात आली आहे. सद्यस्थितीत खाचखळग्यातून मार्गक्रमण करत वाहनचालक आणि कोकणवासियांचा खडतर प्रवास सुरूच आहे. महामार्गावरील ठिकाठिकाणी बायपास, उड्डाणपूल, पूल, मोर्यांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसून येते.www.konkantoday.com